जामिनासाठी छगन भुजबळांची पुन्हा एकदा धडपड
पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलंय.
मुंबई : पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलंय.
बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे... तर समीर भुजबळांच्या जामीन अर्जावरची सुनावणी २६ फेब्रुवारीला ठेवण्यात आलीय.
सर्वोच्च न्यायालयानं मनी लाँड्रिंग कायद्यातील बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नसल्याचा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता.
भुजबळांचा दावा
महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
गेले २१ महिने आपण जेलमध्ये आहोत... पासपोर्ट ईडीकडे जमा आहे... त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे... त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्यावतीनं कोर्टाला करण्यात आली होती.
मात्र, पीएमएलए कोर्टानं भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्यानं अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.