मुंबई : आर्थिक विवंचनेत सापडल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडागा निघालेला नसल्यानं आजपासून बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बेस्ट उपक्रमाची पालिका आयुक्त, महापौरांच्या उपस्थितीत बैठकीत कुठलाही तोडगा न देता, फक्त नवीन आराखडा तयार करण्यात आल्यानं कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. आजपासून सुरु होणाऱ्या उपोषणाचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागण्याची शक्यता आहे.वडाळा आगारात चालणाऱ्या या उपोषणामुळे बेस्टच्या सेवांवर परिणाम होणार नाही.


बेस्टची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेत मिळणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने बेस्टला आधार द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. 


कामगारांच्या हितासाठी संप पुकारायचा की नाही, यासाठी विविध आगारांमध्ये मतदान होऊन कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. अखेर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला.