मुंबई : अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य अधिकारी चंदा कोचर तसंच व्हिडिओकॉन समूहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकल्यात. बँकेच्या फसवणूक प्रकरणी ईडीनं या धाडी टाकल्यात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीनं मुंबईसह इतर ठिकाणी पाच कार्यालय आणि निवासस्थानांवर तपासणी केलीय. अंमलबजावणी संचालयानं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, वेणुगोपाल धूत आणि इतरांविरुद्ध 'मनी लॉन्ड्रींग' कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुराव्यांच्या शोधासाठी ईडीनं शुक्रवारी सकाळीच छापेमारीला सुरूवात केली. यामध्ये पोलिसांनी ईडीचीही मदत घेतली. 


यापूर्वी केंद्रीय चौकशी समितीनं (सीबीआय) चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यामुळे हे तिघेही जण देश सोडून जाऊ शकत नाहीत. आर्थिक अपराध करून देश सोडून पळून जाणाऱ्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली जाते. त्यामुळे त्यांना विमानतळांवरही रोखलं जाऊ शकतं. 


या तिघांविरुद्ध सीबीआयनं गेल्या महिन्यात १८७५ करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. चंदा कोचर यांच्या कार्यकाळात व्हिडिओकॉनला २००९-११ दरम्यान सहा वेळा कर्ज पुरविण्यात आलं. 


हा भ्रष्टाचार उघड जाल्यानंतर बँकेचे नियम आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 'आयसीआयसीआय'नं त्यांना सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात घेतला. तसेच एप्रिल २००९ ते मार्च २०१८ या काळात व्यवस्थापकीय संचालकपदी असताना बँकेने दिलेले सानुग्रह अनुदानही (बोनस) परत करण्याचे आदेश चंदा कोचर यांना