मुंबई : चंदन सिंग इंडिया बूल वनमध्ये ब्रिक ईगल या बांधकाम व्यवसायाशी संबंधित कंपनीत अकाऊंटंट होता. बदलापूर पूर्वमधील चंद्रेशकुंज या इमारतीत, चंदन सिंग अवघ्या ४ वर्षापूर्वी राहायला आला होता, मनमिळाऊ स्वभावामुळे त्याला ऑफिस आणि सोसायटीत सर्वच ओळखत होते. 


चंदनची पत्नी २६ वर्षांची होती, ती गृहीणी आहे, तर दोघांना २ वर्षांचा मुलगा आहे. चंदन पहिल्यांदा आपल्या मुलाबरोबर गरबा खेळला, गरबा खेळताना मुलासोबतचा त्याचा व्हॉटसअॅप फोटो त्याने डीपीवर ठेवला होता, मात्र दुर्देवाने काल मुलाबरोबर खेळलेला गरबा हा अखेरचा ठरला.