मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई शहर अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे खासदार झाले आणि त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली. तर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार या राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावसाहेब दानवे यांनी आज दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे, असे जाहीर केले होते. त्यानंतर काही वेळात दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, काहीवेळातच चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंगल प्रभात लोढा यांच्यावर मुंबई भाजप अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.



भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची या पदासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.