कोल्हापूर : राज्यातील शेतक-यांच्या 90 टक्के मागण्या आधीच मुख्यमंत्र्यांनी  मान्य केल्या आहेत, उर्वरीत 10 टक्के मागण्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल असा विश्वास  उच्चधिकार मंत्री समितीचे अध्यक्ष महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यानी व्यक्त केला आहे.


कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडल आहे. सरकार शेतक-यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करत असताना पुन्हा रेल रोको सारखे आंदोलन करणार अशी भूमिका का घेतली जात आहे, हे कळत नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.