मुंबई : कर्जमाफीबाबत आडमुठेपणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांना इतर शेतकऱ्यांनी बाजुला केले पाहिजे, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने जो प्रस्ताव मांडलाय. त्यामध्ये ८० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होते. काही शेतकरी नेत्यांनाही कर्जमाफी होऊच नये असं वाटतंय, असा टोलाही महसुलमंत्र्यांनी लगावलाय.  


तर, दोन जून बैठकीत आधी विरोध करणारे नवले हे तत्वत: मुद्दावर हे नंतर राजी झाले. नकारात्मक विचारधारा असणारी माणसं सुकाणू समितीत आहेत... आणि तीचं माणसं मुद्दाम आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केलाय.


गरजू शेतकऱ्यांनाच मदत मिळावी म्हणून लावण्यात आलेले निकष योग्य असून यामुळे बागायतदार धनदांडग्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दहा हजार रुपयंच्या मदतीचा जीआर जाळणे चुकीचं असल्याचंही जयाशी सूर्यवंशींनी म्हटलं. 


राजू शेट्टी हे फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते असल्याचा आरोप करत आमचा लढा 80 टक्के कोरडवाहू शेतकऱ्यासाठी आहे असेही सूर्यवंशी म्हणाले. श्रेयसाठी आंदोलन शेट्टी आंदोलन पेटवत असल्याचा आरोपही सूर्यवंशी यांनी केला.