मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.


दुसरीकडे महाराष्ट्रातल्या विधान भवनात विधानसभेचे आमदार मतदानाचा हक्क बजावत आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २२५ पेक्षा जास्त आमदारांनी मतदान केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विधान भवनात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसंच सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचेच दुसरे आमदार रमेश कदम यांनीही विधान भवनात जाऊन मतदान केलं.