छगन भुजबळांना धर्मदाय आयुक्तांचा जोरदार दणका
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असताना धर्मदाय आयुक्तांनी दणका दिला आहे.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असताना धर्मदाय आयुक्तांनी दणका दिला आहे. भुजबळांच्या एमईटी संस्थेमध्ये सुनील कर्वेंची नियुक्ती करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेत. कर्वे यांनीच भुजबळांविरोधात सर्वप्रथम तक्रार केली होती. संस्थेमध्ये त्यांच्या फेरनियुक्तीमुळे भुजबळांना मोठा दणका बसलाय.
सध्या जामिनावर असलेल्या भुजबळांना महाराष्ट्राबाहेर जाण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. मुंबईबाहेर जाताना त्यांना पूर्वपरवानगीची गरज नसली तरी महाराष्ट्राबाहेर जायचं असेल, तर तपास अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलंय. दुसरीकडे भुजबळांच्या एमईटी संस्थेमध्ये सुनील कर्वेंची नियुक्ती करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेत. कर्वे यांनीच भुजबळांविरोधात सर्वप्रथम तक्रार केली होती. संस्थेमध्ये त्यांच्या फेरनियुक्तीमुळे भुजबळांना मोठा दणका बसलाय.
दरम्यान, काही तासांपूर्वीच छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास परवानगी दिली असून मुंबईबाहेर जाताना पूर्वपरवानगीची गरज नसल्याच न्यायालयाने म्हटले होते. मात्र महाराष्ट्राबाहेर जाताना तपास अधिकाऱ्यांना माहिती देणे भुजबळांना बंधनकारक आहे. कुठे चाललो आहोत याची सर्व माहिती मात्र भुजबळांना तपास अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे.
छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा केला. यात नागपूर, नाशिक, पुणे, येवला येथे भेटी दिल्यात. येवला-लासलगाव मतदार संघात छगन भुजबळ दाखल होतात कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केले जंगी स्वागत केले. यावेळी भुजबळांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती.