चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळून दोघे जखमी
एल्फीस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल धोकादायक बनल्याचे पुढे आले आहे. या स्टेशनवरून पूर्वेकडील ठाकूरद्वारकडे जाणारा पादचारी पूलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई : एल्फीस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल धोकादायक बनल्याचे पुढे आले आहे. या स्टेशनवरून पूर्वेकडील ठाकूरद्वारकडे जाणारा पादचारी पूलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजेच गेल्याच आठवड्यात याच पूलाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन झालं होतं. चर्नी रोड स्टेशन बाहेरील हा पूल धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात स्थानिक शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांसह या आधी अनेक वेळा रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला कल्पना देऊन पूलाच्या दुरूस्तीची मागणीही केली होती. शनिवारी सकाळी महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पूलावर बोलवून खासदार अरविंद सावंत यांनी पहाणी केली होती. यावेळी अधिकाऱ्यांना तात्काळ पूलाच्या दुरूस्तीचं काम करण्यास सावंत यांनी सांगितलं होतं. त्याच पूलाचा काही भाग कोसळला. या पुलाबाबत वारंवार स्थानिकांनी तक्रारी दिल्या महापालिकेला सोमवारी पथनाट्याच्या माध्यमातून महापालिका अधिकाऱ्यांना ‘गेट वर्क सून’आंदोलन केले होते.
दरम्यान, ऐन दसऱ्याच्या तोंडावर एक दिवस आगोदरच (29 सप्टेंबरला) एलफिस्टन स्टेशनवर ती दुर्दैवी घटना घडील. या घटनेत मृत्यू पावलेल्यांचा आकडा सुरूवातीला २३ होता. मात्र, त्यात वाढ होऊन तो आता २९ वर पोहोचला. या सुन्न करणाऱ्या घटनेचे सावट पूर्ण महाराष्ट्रातील दसरा सणावर दिसत होते. दरम्यान, आता या घटनेला काही दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनवरील पुलांबात धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. चर्नी रोड पुलही असाच धोकादायक बनला असून, त्याची योग्य ती दुरूस्ती करावी अशी मागणी पुढे येत आहे.