Mumbai Mega Block: लोकल  सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. मुंबईत (Mumbai Local ) दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करत असतात. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या 70-75  लाखांच्या घरात आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील लोकलला मोठी गर्दी पहालया मिळते. मात्र तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करणार असाल तर थांबा. आजच्या ट्रेनचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा. कारण आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या काळात बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या.


कोणत्या सेवा होणार रद्द?


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा इथून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यावेळी माटुंगा आणि मुलुंड स्टेशनच्या मध्ये ठरवलेल्या थांब्यांवर गाड्या थांबणार असल्याची माहिती आहे. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंडमध्ये डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. 


याशिवाय पनवेल-बेलापूर- वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल-बेलापूर- वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. या काळात सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


डाऊन धिम्या लाइनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटीमधून ही लोकल सकाळी 10.20 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर असून सीएसएमटी स्टेशनवरून ही लोकल दुपारी 3 वाजता सुटणार आहे.


डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटीमधून लोकल सकाळी 10.18 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल असणार आहे. सीएसएमटीमधून ही लोकल दुपारी 3.44 वाजता सुटणार आहे.