गणेश कवडे, झी मीडिा, मुंबई : छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी नॉट रिचेबल असलेले छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिले. एवढंच नाही तर त्यांनी पक्षात सुरु असलेल्या गळतीबाबत चर्चाही केली. भुजबळांच्या राष्ट्रवादीतल्या सक्रिय होण्यानं त्यांचा शिवसेनाप्रवेश बारगळ्याचं अधोरेखित झालं आहे. भुजबळांना शिवसेनाप्रवेशावर विचारलं असता आता ही चर्चा थांबवा असंही भुजबळ म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार


नेत्यांच्या आऊटगोईंगवर राजे गेले तरी प्रजा सोबत असल्याचं सांगत भुजबळांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्य़ामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.



महागळतीत पवारांना भुजबळांचा आधार


गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला गळती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी नेत्यांची समजूत काढायला सुरुवात केली आहे. भुजबळांना रोखण्यात पवारांना यश आल्याचं सध्यातरी दिसतं आहे. महागळतीच्या काळात भुजबळांसारखा नेता राष्ट्रवादीत थांबणं हे पवारांसाठी त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल.