छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरविणार
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
मुंबई : न्यायालयाकडून जामीन मिळालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्य स्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.
संविधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुणए येथील समताभुमी-फुलेवाड्यापासून सुरु झालीये. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. त्यावेळी छगन भुजबळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. यावेळी जर त्यांची सुटका झाली नाही तर त्यांची खुर्ची रिकामी ठेऊन ही परिषद संपन्न करण्यात येईल असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.