मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जेलबाहेर येतील, अशी चर्चा सुरु आहे.


अनेक आरोपींची लवकरच सुटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातलं कलम ४५ सुप्रीम कोर्टानं घटनाबाह्य ठरवलंय. त्यामुळं या आरोपांखाली तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. 


 आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह 


तसंच कलम ४५ मधल्या तरतुदींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेत. त्यामुळं अशा आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत. पीएमएलए कायद्यातील  कलम ४५ हे  काळ्या पैशाला चाप लावण्यात महत्त्वाचे अस्त्र असल्याचे केंद्र सरकारला वाटत होते. 


 हे कलमच घटनाबाह्य


मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे कलमच घटनाबाह्य ठरवल्यानं सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.  याच आधारे छगन भुजबळ आणि रमेश कदम हे युक्तीवाद करणार असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. 


 भुजबळांच्या जामिनावर अंतिम सुनावणी


छगन भुजबळ यांच्या जामिनावर अंतिम सुनावणी आहे. आता कलम ४५ घटनाबाह्य ठरवल्यानं पुन्हा जामिनासाठी जोरदार युक्तीवाद केला जाण्याची शक्यता आहे. भुजबळ आणि कदम यांच्या सारखे देशातून एकूण ८५  तर राज्यातून १२ जण जेल बाहेर येण्याची शक्यता आहे.