अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील Birthday सेलिब्रेशननंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Gangster Chhota Rajan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  डॉनचा भाऊ आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनला आहे (National President of RPI Group A). आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुन्हा छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे (Chhota Rajan's brother Deepak Nikalje) यांची निवड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ने देखील कंबर कसायला सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाची आज राष्ट्रीय परिषद चेंबूर येथे पार पडली. देशभरातील 30 राज्यांमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि कार्यकर्ते या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. 


गँगस्टर छोटा राजन याचे भाऊ दीपक निकाळजे यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यावेळी करण्यात आली. आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं अशी भूमिका यावेळी दीपक निकाळजे यांनी मांडली.


ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्याने लावले छोटा राजनच्या वाढदिवसाचे पोस्टर


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Gangster Chhota Rajan) याच्या वाढदिवस मुंबईत सेलिब्रेट करण्यात आला. छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणारा  ठाकरे गटाचा पदाधिकारी निघाला आहे. पोलिसांनी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली आहे.  कुख्यात गुंड छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं निलेश पराडकरला चांगलंच भोवल आहे.  पराडकर हा ठाकरे गटाचा नवी मुंबईचे संपर्कप्रमुख आहे. 


काय आहे नेमका प्रकार


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. तसे पोस्टर लागले होते. मालाडच्या तानाजी नगरमधल्या गणेश मैदान कुरार व्हिलेज येथे हे भव्य पोस्टर लावण्यात आले होते. छोटा राजन उर्फ नाना यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धा असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होते. सीआर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरवर छोटा राजनचा मोठा फोटोही छापण्यात आला होता. या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी कारवाई करत पोस्टर हटवले तसेच पोस्टर लावणाऱ्यांना ताब्यात घेतले. 


कोण आहे छोटा राजन


2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली त्यानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. 55 वर्षीय छोटा राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी (Most Wanted Criminal) एक आहे. दोन दशकांपासून तो सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होता. छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असं आहे.