मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ भाजपकडून आज मुंबईत फोडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई शहरचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक प्रचाराचा बिगूल वाजवला. यावेळी दोन्ही नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शेलार यांनी शिवसेनेचे नाव न घेतला जोरदार टोला लगावला. तर काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. दरम्यान, २०१९ ची निवडणूक ही भाजपसाठी नाही तर भारतासाठी आहे. २०१९  मध्ये देशाचे भवितव्य आणि भविष्य कुठल्या दिशेने जाईल हे ठरणारे वर्ष असेल, असे मुख्यमंत्री म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजप - शिवसेना युतीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ ची निवडणूक ही भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. दरम्यान, भाजप-शिवसेना युतीबाबत राज्यात वेगवेगळ्य़ा चर्चांना उधाण आले असताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेबाबत मौन बाळगले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र शिवसेनेवर भाष्य करणे त्यांनी टाळले.


काँग्रेस रिकामी पार्टी 


काँग्रेस पार्टी रिकामी झाल्याचा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीकडे खासदारांची दोन आकडी संख्या नसताना पवार पंतप्रधानपदाची संगीत खुर्ची खेळत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. आशिष शेलारांनी मुंबईतल्या सहाच्या सहा जागा जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकाळात काय काम झालं आहे ते सर्वांना सांगा. शत्रू मित्र असतील तर त्यांना ठासून सांगा मुंबईतील सहाही जागा मोदीच जिंकणार आहेत. एक प्रकारे शेलार यांनी शिवसेनेला इशारा हा इशारा दिला आहे.


मेळाव्यातील ठळक बाबी


- २०१९  ला खिचडी सरकार आलं तर या देशाची काय अवस्था होईल.
- याआधी पंतप्रधान कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यांचे हात पाय बांधले होते. कुठलाही निर्णय न घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.
- २०१४ काँग्रेस सोबत असलेले अनेक आता आपल्यासोबत आहे. काँग्रेस आता रिकामी पार्टी आहे.
- २०१९ पर्यंत वर्षे ही मोदी यांच्या सरावाची वर्षे होती. अनेक निर्णय घेत व्यवस्था सुधरवण्याचा प्रयत्न केला. अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे.
- २०१९  ची निवडणुक ही भाजपसाठी नाही तर भारतासाठी आहे.


- २०१९ मध्ये देशाचं भवितव्य आणि भविष्य कुठल्या दिशेने जाईल हे ठरणारे वर्ष असेल
- २०१९  पर्यंत वर्षे ही मोदी यांच्या सरावाची वर्षे होती. अनेक निर्णय घेत व्यवस्था सुधरवण्याचा प्रयत्न केला. अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे.