अण्णा हजारेंशी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेट
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मध्यस्थी करणार आहेत. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीकडे रवाना होणार आहेत. रामलीलावर जाऊन मुख्यमंत्री अण्णांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार मसुदा तयार करत आहे. मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय शिष्टमंडळ अण्णांची आजच भेट घेणार आहे.
मुंबई : समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मध्यस्थी करणार आहेत. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीकडे रवाना होणार आहेत. रामलीलावर जाऊन मुख्यमंत्री अण्णांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार मसुदा तयार करत आहे. मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय शिष्टमंडळ अण्णांची आजच भेट घेणार आहे.
अण्णांच्या मागण्यांवर विचार
सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा दिली आहे. वेळेत लोकपाल नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन अण्णा हजारे यांना दिले आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधार वगळता इतर मागण्यांवर सरकारने यापूर्वीच अंमलबजावणी सुरू केली आहे.
लोकपाल नियुक्ती करण्याचे आश्वासन
अण्णा हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारनं ड्राफ्ट तयार केला आहे. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा दिली आहे. वेळेत लोकपाल नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन अण्णा हजारे यांना दिले आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधार वगळता इतर मागण्यांवर सरकारने यापूर्वीच अमलबजावणी सुरू केली आहे. आज संध्याकाळपर्यंत केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती करणार आहेत.
शोलेस्टाईल आंदोलन
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली इथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राळेगण ग्रामस्थ वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं करीत आहेत. आज ग्रामस्थांनी नगर पुणे रस्ता अडवला. राळेगणसिद्धी गावापासून जवळ असलेल्या वाडेगव्हाण गावात हा रस्ता रोको करण्यात आला.
एरवी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे राळेगण ग्रामस्थ यावेळी काहीसे आक्रमक झाल्याचे चित्र आहे . पुतळा दहन , शोलेस्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आणि रस्ता रोको असे मार्ग राळेगण ग्रामस्थ अवलंबित आहेत. आजच्या रस्ता रोकोमुळे नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.