Pradhan Mantri Awas Yojana, मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने(Shinde-Fadnavis government) 100 दिवसांत 5 लाख घर बांधण्याचे(build 5 lakh houses in 100 days) ध्येय निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी याबाबत माहिती दिली. हक्काचे घर असावे अशी सर्वांची इच्छा असते. 2024 पर्यंत सर्वांसाठी घरे द्यायची असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांचे स्वप्न आहे. राज्यात देखील कुणीही बेघर राहणार नाही असा विश्वास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 


महाराष्ट्र सरकार मोठा विक्रम रचणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निश्चित वेळेत घर निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. 100 दिवसांत घरे बांधली तर हा मोठा विक्रम ठरणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना अनेक विक्रम मोडले. कमी दिवसांत आपण जास्त निर्णय घेण्याचा विक्रम केला. राज्याचा सर्वांगीण विकास हेच टार्गेट. पर्सनल अजेंडा नाही. पेट्रोल, डिझेल पासून शेतकरी हक्क आणि घर देण्यापर्यंत सर्व निर्णय सरकार घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहे. 


राज्यात कुणीही बेघर राहणार नाही


राज्यात कुणीही बेघर राहणार नाही. सर्वांना घरे मिळावी यासाठी नवी योजना आणणार. पूर्वीची थांबलेली कामे व मंदावलेल्या विकासकामांना आम्ही गती देत आहोत. शासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढेल. अधिकारी व कर्मचारी काम करतात म्हणून लोकांपर्यंत योजना पोहोचतात. घेतलेले निर्णय लोकांपर्यंत वेळेत पोहचवण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करतात. त्यातून सरकारची प्रतिमा तयार होत असते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवास योजना सुरु केली. ग्रामीण भागात अतिशय चांगले काम ग्रामविकास यंत्रणेने केले आहे. नव्या सरकारने याचा आढावा घेतला. मार्च 2023 पर्यंच 5 लाख गृहप्रवेश करण्याचा निर्धार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


उत्तर प्रदेशमध्ये 110 दिवसांत घरांचे बांधकाम पूर्ण झाले


उत्तर प्रदेशमध्ये 110 दिवसांत घरांचे बांधकाम पूर्ण झाले.  महाराष्ट्रात 100 दिवसांत पाच लाख घरे पूर्ण करण्याचा रेकॉर्ड करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. घाईघाईत घर बांधायचे नाही. गुणवत्तापूर्ण काम करायला हवे असा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.