Maharashra Shinde Government : महाराष्ट्रात आता शिंदेशाही सरकारची सुरुवात झाली आहे. शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि हे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर गेले आठ दिवस राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंद आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यात आलं आणि या सत्तासंघर्षावर पडदा पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याबरोबर आलेल्या 50 आमदारांच्या विश्वासाला कधीडी तडा जाऊ देणार असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी सर्व समर्थक आमदारांचे आभार मानले. त्यानंतर आता मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर विश्वास दाखवलेल्या आमदाराला सुखद धक्का दिला आहे. 


एकनाथ शिंदे गटात अगदी शेवटच्या क्षणी मंत्री उदय सामंत सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना नव्या सरकारच्या पहिल्याच दिवशी मोठं गिफ्त दिलं आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिलेले आहेत.


हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार उदय सामंत यांनी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलंआहे. पुढच्या वर्षापासून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश घेता येणं शक्य होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.   तर उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानणारं ट्विट केलं आहे. उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'रत्नागिरी जिल्ह्याच्यासरकारी वैदयकीय महाविद्यालयाचा(Medical Collage)प्रश्न मार्गी लागणार, पुढच्या वर्षी होणार कॉलेज मध्ये प्रवेश, रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होऊन आरोग्य सुविधेत होणार आमूलाग्र बदल,मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वैद्यकीय विभागाला आदेश'