नवी दिल्ली : दिल्लीत नवीन संसद भवन बांधण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी यांनी या संसद भवनावर बसवण्यात येणाऱ्या अशोकस्तंभाचं अनावरण केलं होतं. पण आता या नवीन संसद भवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र लावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं ही बोललं जात आहे. नव्या संसद भवनातही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून याबाबत आवाहन करणार आहे. त्यांच्या मागणीवर पंतप्रधान मोदी सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय.


नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे. 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात हे बांधण्यात येत आहे.