Cm Eknath Shinde on abdul sattar : अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकच वादंग माजला. राज्यभरातून सत्तार यांच्या विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सत्तरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कान टोचले आहेत. यावेळी त्यांनी सत्तार यांना त्यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवक्त्याची बैठक बोलावली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते आणि महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद न साधण्यावर मुख्यमंत्री काढणार असल्याची चर्चा रंगलीये.


सत्तार नक्की काय म्हणाले?


मराठवाड्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार होती. या सभेच्या नियोजनाची जबाबदारी सत्तारांकडे होती.  याआधी सत्तारांवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न सुळेंनी केला होचा. या टीकेबाबत उत्तर देताना सत्तारांचे जीभ घसरली. "तुम्हालाही 50 खोके द्यायचे का?" तसेच इतकी भिकार@# झाली असेल तर तिलाही देऊ", अशा एकेरी भाषेत म्हणत गलिच्छ शब्दात सत्त्तारांनी टीका केली.