मुंबई : राजकीय वर्तुळातून (Political News) मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला (Guwahati Tour) जाणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे आपल्या सर्व आमदारांसह गुवाहाटी दौरा करणार आहेत. ठाण्याच छटपूजेचं (Chatpuja 2022) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिंदेंनी गुवाहाटी दौऱ्याला जाणार असल्याची घोषणा केली. (chief minister eknath shinde will visit guwahati again with his mla)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटी दौऱ्यात मुख्यमंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीचं पुन्हा दर्शन घेणार आहेत. तसेच शिंदे सरकारमधील मंत्री आणि समर्थक आमदार अयोध्या वारीलाही (Ayodhya Tour) जाणार आहेत. दरम्यान हा दौरा कधी असणार आहे, याबाबतची माहिती मिळालेली नाही. 


राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आसाममध्ये मुक्कामाला होते. तेव्हा राज्याचं केंद्रबिंदू हे आसाममधील गुवाहाटी हे होतं. तेव्हाही शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. दरम्यान आता गुवाहाटी दौरा कसा असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.