मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी आज दुपारी 1.30 वाजता संवाद साधणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढण्याचा विश्वास व्यक्त आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री वारंवार योग्य त्या नियमांचं, खबरदारीचं पालन करण्याचं आवाहन जनतेला करत असतात.
कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झी २४ तासच्या ' ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे' या खास कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी कोरोनाने स्वत: कडे कुटुंबाकडे, शिक्षण, आरोग्याकडे पाहायला शिकवलं असल्याचं म्हटलं. आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज असून येत्या काळात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करणार आहेत. याआधी मोदींनी 31 मे रोजी जनतेला संबोधित केलं होतं. त्यावेळी मोदींनी लोकांना कोरोनाविरोधात लढाई जिंकण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करणं, मास्क घालणं आणि वारंवार हात धुण्याचं आवाहन केलं होतं.