Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief minister uddhav thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief minister uddhav thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपनं शिवसेनेला वापरलं आणि फेकून दिल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे. तसेच शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, अशी टीका करतानाच भाजपनं वचन मोडलं म्हणून नवा घरोबा करावा लागला, असं स्पष्टीकरण त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना दिलं. (chief minister uddhav thackeray critisized to bjp at mumbai)
बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची अशी लाट आली होती की, तेव्हाच सीमोल्लंघन केलं असतं तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मोठी नेते उतरत नाहीत, याबद्दल त्यांनी यावेळी कानउघाडणीही केली.
"आपल्या हाती तलवार नसली तरी तलावर गाजवणं हे नसानसात भिनल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसच नुसते पुतळे बांधून थांबू नका तर तेजाचा वारसा पुढे न्या", असा संदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिला. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्याआधी मुंबईत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. माझगावमधील महाराणा प्रताप चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.