मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिट मोडमध्ये ? मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज महत्वाची बैठक
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या गटाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या गटाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे 35 हून अधिक आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. आज मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची ऑनलाईन मिटींग होणार आहे.
शिवसेनेतील कलहाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सरकार अल्पमतात येऊ शकतं. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता मंत्रालयातील सचिव स्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिट मोडमध्ये आहेत का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.