मुंबई : सामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकलचा ( Mumbai Local ) प्रवास कधी सुरु होणार याबाबत अद्याप ठोस उत्तर मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत आता स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray On Mumbai Local Train Service)जबाबदारीचे भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार आहे, अशी मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले आहे. आता पुढील सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई लोकलसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लवकरच लोकल सुरु होणार असे संकेत मिळत आहे. दरम्यान, जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. त्यासंदर्भात लवकरच मुंबईकरांशी संवाद साधणार, असेही ते म्हणाले.



गेल्या काही दिवसांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून देखील त्यासंदर्भात वारंवार मागणी केली जात असताना हे प्रकरण सध्या हायकोर्टात देखील सुनावणीखाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार, यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. मुंबईतील एच-पश्चिम वॉर्डमधील वॉर्ड ऑफिसच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.