मुंबई : मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या कामाची स्तुती केली. यापूर्वीच्या सरकारनेची चांगली कामं केली असं त्यांनी म्हटले आहे. भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत चांगलं काम केल्याचं म्हटले. (Chief Minister Uddhav Thackeray praised Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दोन चार वर्षांत मुंबई बदलणार आहे. मुंबईचे रुपडे पालटणार आहे. मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केलं त्या पेक्षा अधिक वेगाने काम करत नागरिकांच्या सेवेस उतरू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दहीसर ते डीएन नगर ही मेट्रो 2 अ आणि दहीसर ते अंधेरी ही मेट्रो 7 दाखल होणार आहे. या मेट्रोच्या कोचेसचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारकोच्या कारशेडमध्ये अनावरण करण्यात आले.