मुंबई : राज्याच्या राजकारणात आज एका बातमीची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) हे मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) पोहोचले आणि ही चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अचानक उच्च न्यायालयात का गेलेत. नेमके काय कारणे असे एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. त्याचवेळी  मुख्यमंत्र्यांनी आज अचानक उच्च न्यायालयात भेट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. त्यामळे चर्चा अधिकच रंगली. मात्र, या चर्चेवर पडदा पडला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Reached Mumbai High Court )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उच्च न्यायालयात पोहोचले त्याचे कारण वेगळे होते. येथे कोणता खटला नव्हता की सुनावणी. उच्च न्यायालयात लसीकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट असल्याचे सांगणयात येत आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महाधिवक्ते कुंभकोणी उपस्थित होते. दरम्यान, एकीकडे मुंबई उच्च न्यायालयात कोरोना विषयक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवरुन न्यायालयाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. ऑक्सिनज तुटवडा, रेमडेसिवीर, लॉकडाऊन यावरुन अनेकदा न्यायालयाने राज्य सरकारची सुनावले होते. तसेच, कोरोनाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे या भेटीमागे हे एक कारण नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र, सरकारकडून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जोरदार चर्चेवर पडदा पडलाय.