मुंबईत दिवसाढवळ्या सुरू आहे बालमजुरी
चेंबूर अमर महाल इथे पुलाचं काम सुरू आहे. या कामावर काही लहान मुलं काम करताना दिसत आहेत.
मुंबई : बाल मजुरी करून घेणं हे कायद्याने गुन्हा आहे. पण राज्याच्या राजधानीत दिवसाढवळ्या बालमजुरी खुलेआम आणि धडाक्यात सुरू आहे. चेंबूर अमर महाल इथे पुलाचं काम सुरू आहे. या कामावर काही लहान मुलं काम करताना दिसत आहेत.
दुरूस्तीचं काम सरकारी यंत्रणेतर्फे
नादुरूस्त पोल तोडून दुरूस्तीचं काम सरकारी यंत्रणेतर्फे सुरू आहे. तरीही इथे बालमजूर काम करत आहेत. ही मुलं हातोड्यान काँक्रीट तोडून त्यातील लोखंडी गज काढताना दिसत आहेत. मात्र इथे असलेल्या कर्मचा-याकडे विचारणा केली असता त्याने अजब उत्तर दिलं.
ही चोरी आहे का बालमजुरी?
ही मुलं बालकामगार नाहीत तर चोर आहेत, असं त्याचं म्हणणं आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते दगड फेकून मारतात, असं या सुरक्षारक्षकाने सांगितलं. काम सुरू असताना इथे कोणाचं लक्ष नाही का... ही चोरी आहे का बालमजुरी असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.