पत्रकार जे डे हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी
या प्रकरणात छोटा राजन हा देखील दोषी असल्याचं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे.
मुंबई : पत्रकार ज्योतीर्मय डे म्हणजेच जे डे यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल आला आहे. या प्रकरणात छोटा राजन हा देखील दोषी असल्याचं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. यात विशेष मकोका न्यायालयाने निकाल देताना ९ जणांना दोषी ठरवलं आहे, तर पत्रकार जिग्ना व्होरा हिला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. शूटर सतिश काल्या आणि विनोद चेंबूर यांनी जे डे यांच्यावर गोळ्य़ा झाडल्या होत्या, यांच्यासह अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे हे देखील दोषी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. जे डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या करण्यात आली होती, जे डे हे इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकारिता करत होते. जे डे यांचा अंडरवर्ल्डविषयी मोठा अभ्यास होता. जे डे यांच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज देखील आलं होतं.