मुंबई : भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय स्वातंत्र्यचळवळीत ख्रिश्चनांचं योगदान नव्हतं. असा जावईशोध खासदार शेट्टींनी लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ख्रिश्चन समुदायानं जोरदार आक्षेप नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपमधल्या बोलघेवड्या नेत्यांच्या यादीत आता शेट्टींची भर पडली आहे. त्यांच्या या मताशी पक्ष सहमत नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे. मात्र एवढं झालं तरी शेट्टी माफी मागायला तयार नाहीत. उलट खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेट्टींना सबुरीचा सल्ला दिल्यानंतर शेट्टींनी राजीनाम्याचा निर्णय तूर्तास रद्द केला आहे.


देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चनांचा सहभाग नव्हता असा असं भाजपचे खासदार म्हणतात. मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी असलेल्या अॅनी बेझंट या ख्रिश्चनच होत्या हे विसरता येणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.