नवी मुंबई: आपलं मुंबई किंवा उपनगरात छोटं का असेना घर असाव असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली आहे. घर घेऊ इच्छित असलेल्यांसाठी सिडकोकडून एक आनंदाची बातमी येत आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सिडकोची 89 हजार घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच ही सोडत निघणार असल्याची घोषणा सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी केली. त्यामुळे 1 लाख  4 हजार घरांची निर्मिती सिडको येत्या काळात करणार आहे. पनवेलमध्ये सिडकोकडून लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यात आलं. सिडकोनं 2 वर्षांपूर्वी 15 हजार घरांची लॉटरी काढली होती. पण हा प्रकल्प रखडला. 


अखेर राज्य सरकारनं आदेश दिल्यानंतर घरवाटप सुरू झालं. कळंबोलीतील 100 घरांच्या मालकांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी चाव्या देण्यात आल्या. कोरोना आणि लॉकडाऊनमध्येही रखडलेल्या प्रकल्पांमध्ये घरं घेतलेल्या लोकांना कीकडे घरांचे हप्ते भरावे लागत होते. 


दुसरीकडे घर मिळण्यास लागणारा विलंब तर तिसरीकडे राहत्या घराचे भाडे. अशा विवंचनेत सिडको घर लाभार्थी अडकले होते. या प्रकरणात अखेर राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागला. राज्य सरकारच्या निर्देशांनंतर लाभार्थींना सि़डकोच्या घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात आली. 


कळंबोली येथील गृह प्रकल्पातील 100घर लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चावीवाटप करण्यात आलं. येत्या काळात सिडको कडून 89 हजार घरांची बंप्पर लॉटरी काढणार आहे. त्यामुळे 1 लाख  4 हजार घरांची निर्मिती सिडको येत्या काळात करणार असून घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.