मुंबई : साकीनाका फरसाण मार्ट, कमला मील कम्पाऊंट पाठोपाठ काल रात्री मुंबईतल्या कांजुरमार्ग येथे सिने विस्टा स्टुडिओला आग लागली होती. रात्री या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र आज सकाळी कुलिंगचे काम सुरू असताना एक  मृतदेह हाती लागला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाचा मृत्यू  


सिने विस्टा स्टुडिओत ऑडिओ असिस्टंट  म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.    गोपी वर्मा ऑडिओ असिस्टंट म्हणून काम  करत होते.   गोपी वर्मांचा याामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी लागलेल्या आगीत संपूर्ण स्टुडिओ जळून खाक झाला होता..  आग लागली त्यावेळेत कलाकर आणि इतर कर्मचारी शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यावेळी स्टुडिओत 150 तंत्रज्ञ आणि कलाकार उपस्थित हेते. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं होतं.