मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात थैमान घालणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूचा सर्वाधित परिणाम हा देशाची आर्खिक राजधानी, अर्थात मायानगरी मुंबईत दिसून येत आहे. मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, येत्या काळात प्रसाशनासमोर गंभीर आव्हानं असणा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत मुंबईत दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून, परिणामी हॉटस्पॉटही वाढच आहेत. मागील २४ तासांत शहरात कोरोनाचे १५० रूग्ण वाढले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण रूग्ण संख्या पोहचली १५४९वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत या विषाणूच्या विळख्यात येऊन १०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब ठरत आहे. 


मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत त्या विभागांना पालिकेने रेड झोन घोषित केलं आहे. आतापर्यंत जी/दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के/दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच/पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम/ई) या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


 


धोका जास्त असणाऱ्या या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. धारावी आणि वरळी कोळीवाडा येथे प्रशासनाकडून खास काळजी घेण्यात येत आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.