मुंबई : मुंबईतल्या सिटी कॉऑपरेटिव्ह बँक ठेवीदारांनी ठाकरे सरकारकडे न्याय देण्याची मागणी केलीय. त्यासाठी ठेवीदारांनी मातोश्री, शिवसेना भवन आणि गिरगाव येथील सिटी बँकेच्या समोर बॅनर लावले आहेत. ठाकरे सरकार ठेवीदारांना न्याय मिळवून देणार का? असा प्रश्न बॅनरद्वारे उपस्थित करण्यात आलाय. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सिटी कोऑपरेटीव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पैसे काढण्यावर मर्यादा 


यामुळे ठेवीदारांना पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेत आर्थिक घोटाळा झाल्याने त्याची ईडी मार्फत चौकशीची मागणी ठेवीदारांनी केलीय. 


या बँकेत ठेवीदारांचे सुमारे ४५० कोटी रूपये अडकले आहेत. तर बँक सुमारे १५० कोटी रूपये तोट्यात आहे. गेल्या दीड वर्षांपासून ठेवीदार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत.