मुंबई : मुंबईमध्ये आज मोठं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. ५००० बीच वॉरियर्सने एकत्र येत मुंबईतून १०० टन कचरा साफ केला. सीएसएमटी पासून ते कल्याण, पनवेल, विरार, या सर्व परिसरातून हा सर्व कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानाला १०० आठवडे पूर्ण झाल्यानिमित्त ही महास्वच्छता मोहिम बीच वॉरियर्सतर्फे राबवण्यात येत आहे. याअंतर्गत अभिनेत्री ईशा गुप्ता, अभिनेता सुशांत सिंह हे देखील सहभागी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील कचरा सफाईचे सर्वात मोठे अभियान आज राबविण्यात आले. सीएसएमटीपासून कल्याण, पनवेल, विरार, अंधेरी, बांद्रा या रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांत सफाई केली. 



समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेस १०० आठवडे पूर्ण झाल्यानंतर बीच वॉरियर्स संस्थेने त्यापुढील मोठा आवाका असलेली महास्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून मुंबई आणि परिसरातून दोन तासांत सुमारे १०० टन कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट पुर्ण केले. किनाऱ्यांपासून दूर असलेल्या ठाणे, कल्याण आदी भागांत स्वच्छता अभियान राबविण्यात आले अनेक सिनेकलाकारांनी, सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कचरा साफ केला.


दादर, वरळी, वांद्रे, जुहू आदी किनाऱ्यांवर घेतलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला. या कचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळले. त्यामुळे पावसाळ्यात किनाऱ्यांजवळ कचरा न फेकण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.