मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात विरोधकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु झाले. मात्र अभिभाषणाच्या अनुवादाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मराठी अनुवाद न झाल्याने विरोधकांनी हा मुद्दा उचलला. 


याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभागृहात माफी मागितली. मराठी अनुवाद न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माफी मागितली.


सभागृहात मराठीऐवजी गुजरातीमध्ये अनुवाद ऐकू आला असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.