मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी चक्क लोकल ट्रेननं प्रवास केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ असा प्रवास त्यांनी मध्य रेल्वेनं केला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, खासदार अरविंद सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत प्रवास केला. 


एलफिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर लष्करानं बांधलेल्या एलफिन्स्टन-परळ, करीरोड तसंच आंबिवली पुलांचं उद्घाटन आज होतंय. सामान्य नागरिक तसंच डब्बेवाल्यांच्या हस्ते या पुलांचं उद्घाटन होणार आहे. 


या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री तसंच केंद्रीय रेल्वेमंत्री लोकलनं गेले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रवाशांनी तोबा गर्दी केली होती.