मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पंढरपूरऐवजी यंदा मुंबईतील वर्षा निवासस्थानीच ते पहाटेच्या वेळी विठ्ठलाची पूजा करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पंढरपूरला रांगेतील पहिल्या वारकऱ्याच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा केली जाणार आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी त्यावेळी उपस्थित असणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.