मुख्यमंत्री चार दिवसांच्या द. कोरिया, सिंगापूर दौऱ्यावर
राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत. २६ ते २९ सप्टेंबर असा चार दिवसांचा दौरा असेल. काही मंत्री तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांबरोबर असणार आहेत. या दौ-यात प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्याबाबत करार करणे तसंच पायाभूत सुविधांबाबत सामंजस्य करार करणे असे दौ-याचे स्वरुप असणार आहे.
मुंबई : राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरच्या दौ-यावर जात आहेत. २६ ते २९ सप्टेंबर असा चार दिवसांचा दौरा असेल. काही मंत्री तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांबरोबर असणार आहेत. या दौ-यात प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्याबाबत करार करणे तसंच पायाभूत सुविधांबाबत सामंजस्य करार करणे असे दौ-याचे स्वरुप असणार आहे.
दक्षिण कोरिया दौ-यात ३ प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्यासाठी वाटाघाटी होणार.
'कोरिया लॅन्ड अँड हाऊसिंग कोर्पोरेशन' या बँकेबरोबर अर्थपुरवठ्यासाठी चर्चा होणार. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे सरकारी वसाहत पुर्ननिर्माण प्रकल्प, कल्याण - डोंबिवली स्मार्ट टाऊनशिप प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्याबाबत चर्चा होणार
तर सिंगापूर दौरा हा विमानतळ प्रकल्पांसाठी असणार आहे. नागपूर आणि नव्याने विकसित होणारे पुण्याजवळील पुरंदर विमानतळबाबत करार होणार. जगात सर्वोत्कृष्ट आणि स्मार्ट विमानतळ म्हणून नावाजलेल्या सिंगापूरच्या Changi Airport बरोबर करार होणार.