मोदींनंतर महाराष्ट्रातील `या` नेत्याला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी
...
मुंबई : एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी देणारी दोन पत्रं मंत्रालयात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी या पत्रांमध्ये देण्यात आलीय.
नक्षलवाद्यांनी हे पत्र पाठवल्याचा संशय आहे. एप्रिलमध्ये गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांविरोधातल्या सगळ्यात मोठ्या कारवाईनंतर ही पत्रं मंत्रालयात आली आहेत.