राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी `खुशखबर`
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी `खुशखबर` आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी 'खुशखबर' आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
काय केल्या मागण्या?
या मागणीसोबतच पाच दिवसांचा आठवडा तसंच निवृत्तीचं वय ६० वर्षं करण्याबाबत देखील सकारात्मक विचार सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्या.
संगोपन रजेबाबत निर्णय
फेब्रुवारीच्या वेतनात महागाई भत्ता रोखीनं देण्यास सुरूवात केली जाईल, तसंच महिला कर्मचाऱ्यांच्या बाल संगोपन रजेबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.