एलिफंटा बोट अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात झाला आहे. या अपघात दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 21 जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत 84 प्रवासी त्या बोटीत असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
80 प्रवासी बोटीत होते
बोटीच्या मालकांचा दावा नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीत 80 प्रवासी होते. पण ही बोट 84 प्रवासी क्षमतेची होती. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट 103 प्रवासी घेऊन जाण्याचा क्षमतेची होती. तसेच पट्टे यांनी असा आरोप केला आहे की, नेव्हीच्या बोटीने नीलकमल बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
बोट उलटल्यानंतर युद्धपातळीवर बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बचावकार्याची माहिती
मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.