COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तसेच सौम्य गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना यावेळी दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारने आरक्षण मंजुर केलं पण न्यायालयात आरक्षण अडल्याचा पुनर्रोच्चारही त्यांनी यावेळी केला. न्यायालयात कायदा टीकावा हिच भूमिका असू मराठा आरक्षणाचा प्रश्न विधिमंडळात सोडवायचा असल्याचेही ते म्हणाले.


'अहवाल लवकर द्यावा'


मेगाभरतीबद्दल मराठा आणि इतर समाजामध्ये अनेक संभ्रम पसरवले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. घाईने मेगाभरती होणार नसल्याचे सांगत याबद्दल संभ्रम बाळगू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागासवर्ग आयोगाने अहवाल लवकरात लवकर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.


हिंसेमागे अपप्रवृती


हिंसेने कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत याचा पुनर्रोल्लेख करत शांततापूर्व मोर्चा ही मराठा समाजाची ताकद आहे, मराठा समाजाच्या शांतातापूर्ण मोर्चाची दखल संपूर्ण देशाने घेतल्याचे सांगत आंदोलनाच्या हिंसेमागे अपप्रवृती असल्याचेही ते म्हणाले.