कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जात तेव्हा अशा घटना घडतात- मुख्यमंत्री
Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
CM Ekanth Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. अजित पवार यांनी दुपारी 2.30 वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जाणून घ्या प्रत्येक क्षणाची अपडेट
मी अजित पवार आणि सहकाऱ्यांचं स्वागत करतो. त्यांच्या अनुभवाचा सरकार चालवताना नक्कीच फायदा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जात तेव्हा अशा घटना घडतात- मुख्यमंत्री
डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. आता हे सरकार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वेगाने धावेल.