Maharashtra Political Crisis: येत्या तीन ते चार दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार, याच आठवड्यात शपथविधी

Maharashtra Political Crisis Live Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.    

Maharashtra Political Crisis: येत्या तीन ते चार दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार, याच आठवड्यात शपथविधी

Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. 

 

 

2 Jul 2023, 19:15 वाजता

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची 5 जुलै रोजी बैठक होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यशवंतर चव्हाण येंटर येथे बैठक होईल. काहीनी स्वतः. मंत्री मंडळात जाण्याची भूमिका घेतील. पक्षाची मान्यता न घेता शपथ घेतली. ज्या सदस्यांन बोलवले त्यांनी सर्वानी शरद पवार यांना फोनवर केला होता. काही आमदार माझ्या समवेत फोनवर बोलले. सत्तेत बहुमत असताना पुन्हा विरोधी पक्ष नेते फोडण्याचे काम केले, अशी टीका जयंत पाटील यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली.

2 Jul 2023, 18:17 वाजता

नऊ मंत्र्यांच्या शपथविधीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याने पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहिला. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून फडणवीस साहेबांच उत्तम नियोजन आणि शिंदे साहेबांचा विकास पाहून अजितदादा या सरकारच्या प्रेमात पडले होते. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजित दादांच्या लक्षात आलं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली असून कालपर्यंत खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन सरकारमध्ये आले त्यांच आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो अश्या शुभेच्छा कडू यांनी दिल्या आहे.

2 Jul 2023, 17:10 वाजता

Maharashtra Politics : अजित पवार यांनी 40 आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या पोस्टरवरील अजित पवारांचा फोटो फाडला. तर पोस्टरवरील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे.  मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर नाराज कार्यकर्ते घोषणाबाजी देत आहेत. 

2 Jul 2023, 17:03 वाजता

Ramdas Athawale on Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजितदादा पवार यांनी केलेले बंड हे अत्यन्त धाडसी आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे आपण स्वागत करतो.पुन्हा एकदा नव्याने  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे आपण अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. 

2 Jul 2023, 16:58 वाजता

Sharad Pawar Live : उद्धव ठाकरे, काँग्रेससोबत चर्चा करुन विरोधीपक्षनेतेपदाचा निर्णय घेणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जे पक्षाच्या चौकटीबाहेर गेले त्या प्रत्येकावर कारवाई होणार, असं अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का असं विचारल्यावर ते म्हणाले. 

2 Jul 2023, 16:53 वाजता

Sharad Pawar Live : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील काही आमदारांना सोबत घेत आज राज्यपालांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षावर थेट दावा केला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्टी केली. ते म्हणाले की, ज्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीच्या आमदारांवर केलेले भष्ट्राचाराचे आरोप खोटे होते. पक्षातील बंड हा माझ्यासाठी नवीन नसून 1980 लावली 56 आमदार सोडून गेले होते. दरम्यान 6 जुलै मी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

2 Jul 2023, 16:47 वाजता

उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत, नांदा सौख्य भरे, असं म्हटलं आहे. 

2 Jul 2023, 16:14 वाजता

Ashok Chavan on Maharashtra Politics : शिंदे-फडवणीस सरकार अस्थिर असल्यामुळेच भाजपला फोडाफोडीचे राजकारण करावे लागतंय अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपलं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी कायम राहिल, असा विश्वास त्यांना मी दिला असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

2 Jul 2023, 16:09 वाजता

Ajit Pawar Deputy CM Live :  अजित पवार महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं छगन भुजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. तसंच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सहभागी झालो आहोत असं सांगितलं आहे.

2 Jul 2023, 16:06 वाजता

Ajit Pawar Deputy CM Live :  अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहे. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.