Diwali 2023 : BMC कर्चमाऱ्यांची दिवाळी गोड; यंदा `इतका` मिळणार बोनस, मुख्यमंत्र्यांची घोषणा!
Diwali Bonus News: वर्षा निवासस्थानी यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केलाय.
BMC Diwali Bonus 2023 : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 26 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shindr) यांनी आज येथे केली. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या (BMC) सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे आता बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आदित्य ठाकरेंचा सवाल
दिवाळी तोंडावर आली आहे. देशात सर्वत्र नागरिकांकडून दिवाळीची जोरदार तयारी केली जात आहे. पण मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’चे कर्मचारी अद्याप बोनसची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. त्यानंतर आता शासनाने मोठी निर्णय घेतला असून बोनस जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस
ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus) भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता.