Mumbai Central Park: अनेक सुविधांनी युक्त असलेले असे सेंट्रल पार्क आता मुंबईत उभारण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेले सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. रेस कोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर जागेवर सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इंग्लंडमधील लंडन येथील उद्यानांच्या धर्तीवर ते विकसित केले जाणार आहे. ते बीएमसी बांधणार आहे. मुंबई महानगरपालिका याचे बांधकाम करणार आहे. (Central Park At Mahalaxmi Race Course)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केला होता. मुख्यमंत्री कॉन्ट्रेक्टरसोबत मिळून महालक्ष्मी रेसकोर्सची जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत मंत्रिमंडळाने रेस कोर्समध्ये सेंट्रल पार्क उभारण्यास मंजुरी दिली. 


घोड्यांसाठी तबेले बांधणार 


महालक्ष्मी रेसकोर्सवरील 91 एकर जागेवर मुंबई महानगरपालिका 100 कोटी खर्च करुन घोड्यांसाठी तबेला बनवणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या 76 टक्के सदस्यांनी 30 जानेवारी रोजी रेसकोर्समध्ये पार्क उभारण्यात यावे यासाठी मतदान केले होते. तेव्हाच या जागेत सेंट्रल पार्क उभारण्यात येईल, असे ठरले होते. 


थकबाकी वसूल करणार


महालक्ष्मी रेसकोर्सचा हा भूखंड 1914मध्ये रेस कोर्स व्यवस्थापन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWIC)ला भाडेतत्वावर देण्यात आला होता. या कराराची मुदत 2013मध्येच संपण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत बीएमसीने क्लबकडून भाडे वसुली केली नाहीये. मात्र आता बीएमसी महसूल आणि वन विभागाने निश्चित केलेल्या दराने थकबाकी वसूल करणार आहे, असं सरकारने नमूद केलं आहे. 


महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरातील 320 एकर जागेवर उद्यान उभारले जाणार आहेत. रेसकोर्स अंतर्गंत 120 एकर आणि कोस्टल रोडखाली सुमारे 200 एकर जागेवर हे उद्यान उभारण्यात येणार आहे. हे मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क असेल, असं मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या उद्घाटनाप्रसंगी म्हटलं होतं.