मुंबई : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनेक निर्णयांवर जोरदार टीका केली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट (Shinde vs Thackeray Group) यांच्यात यावरुन येणाऱ्या काळात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर आणि नंतर आता धनुष्यबाण (bow and arrow) या चिन्हावर दावा केला जात आहे. यावर निवडणूक आयोग (Election commission) लवकरच निर्णय घेणार आहे. शिंदे गटाकडून अगोदर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.


'धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लावावा नंतर इतर मुद्द्यांवर सुनावणी घ्यावी. ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर केला जातोय. असा निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात शिंदे गटाने दावा केलाय. तात्काळ सुनावणी घ्या अशी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे.


शिंदे गटाचा आरोप


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळं ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, राज्य प्रमुख, मूळ सदस्य, पदाधिकारी आपल्या बाजूने आहेत. याबाबतची आकडेवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दिली आहे.


निवडणूक आयोगानं वारंवार मुदत दिली तरीही गटाने एकही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाचा मान राखला जात नाही. असा दावा देखील शिंदे गटाने केला आहे.