Diwali Bonus : मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस (Diwali Bonus) बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक पार पडली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुशखबर दिली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 22,500 हजार बोनस मिळणार आहे. (Diwali bonus 2022 for BMC employees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं की, महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांनी 22500 सानुग्रह अनुदान आणि आरोग्य सेविकांना एक वेतन सानुग्रह अनुदान देण्याचा एतिहासिक निर्णय झाला. गेल्यावर्षी वीस हजार रुपये कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला होता, मात्र यंदा अडीच हजार रुपये त्यात वाढ करण्यात आली.


सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर,  महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी यंदा 25 हजार दिवाळी बोनसची (Diwali Bonus) मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक इकबाल चहल (Iqbal chahal) यांनी याआधी कृती समितीची बैठक बोलावली होती. कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त देण्यात येणाऱ्या बोनससंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिका कामगार संघटनांचे नेतेही या बैठकीला उपस्थित होते.